dr.satish best web design developer for mac

कसबा नूल ग्रामपंचायत :

जयप्रकाश नारायण यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या किल्ले सामानगडच्या पायथ्याशी व हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेले हे आमचे क।। नूल गाव. कसबा नूल म्‍हणजे स्‍वातंत्र्यासाठी देशभक्‍ती, लढण्‍याची शक्‍ती म्‍हणजे कसब ही नूलच्‍या लोकांमध्‍ये होती म्‍हणून नूलचे कसबा नूल हे नाव पडले. महाराष्‍ट्र राज्‍यातील कोल्‍हापूर जिल्‍हयातील गडहिंग्‍लज तालूक्‍यामध्‍ये असलेले असे हे 6283 लोकसंख्‍येचे आमच गाव किल्‍ले सामानगड आपल्‍या छातीचा कोट करून आजही शिवछत्रपतींच्‍या इतिहासाची साक्ष देत आहे. अशा सामानगडाच्‍या पायथ्‍याशी वसलेले आमच गाव आहे. स्‍वातंत्र्याच्‍या चळवळीची सुरूवात झाली तेव्‍हा आमच्‍या कसबा नूलचे २७ स्‍वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते हा एक आमच्‍या गावचा इतिहासच आहे. गावामध्‍ये सुरगेश्‍वर मठ, ओंमकारेश्‍वर मठ, सिध्‍दारूढ मठ, आणि रामनाथगिरी मठ आहेत. सर्व मठ व मठाधिपती समाजाला समतेची भाषा व दिशा देणारे मठ हे आहेत. हे मठ भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविका मोठ्या भक्तीने येथे येतात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

सन 1934 साली आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत प्लास्टिक बंदीसाठी गावातील सर्व कुटुंबाना मोफत कापडी पिशवी वाटप करण्यात आल्या आहेत. मोफत रोप वाटप करून गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला आहे.

सरपंच
श्री. बाजीराव दाजीबा चव्हाण

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. कलप्पा बसवंत देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. अमृत गणपतराव देसाई

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kasaba Nool Grampanchayat
A/p - Kasaba Nool Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone :

Office : 02327– 248513